Breaking News

तोडलेल्या झाडांच्या पाचपट वृक्ष लागवड करा : दराडे


अकोले / ता. प्रतिनिधी 
तोडलेल्या झाडांच्या पाचपट वृक्ष लागवड करा, तेंव्हाच निसर्गाचा समतोल राखला जाईल असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांनी केले.
समशेरपूर येथील अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित वृक्षरोपणप्रसंगी बाजीराव दराडे बोलत होते. यावेळी दराडे यांनी विद्यालयातील 1400 विद्यार्थ्यांकडून आपल्या परिसरात प्रत्येकी पाच झाडे लावून, वृक्ष संवर्धन करण्याचे वचन घेतले. बाजीराव दराडे पुढे म्हणाले की, सर्वत्र वृक्षलागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन केले तरच, आपल्या परिसराची दंडकारण्य म्हणून असलेली ओळख टिकवता येईल असेही दराडे म्हणाले.
या कार्यक्रमास समशेरपूर जि.प. शाळा केंद्रप्रमुख दिकोंडा मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, कासम मणियार, विष्णू उगले, अयुब शेख, मीनाक्षी थोरात, पर्यवेक्षक ए.डी. अडांगळे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बी.व्ही.सहाणे यांनी वृक्षारोपणसाठी असलेला काळ, वृक्षारोपणाची जागा, झाडांची निवड, वृक्षारोपणानंतरची काळजी आणि वैज्ञानिकदृष्ट्या होणारे वृक्षारोपण याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सुधाकर आल्हाट यांनी आता एक लक्ष्य लावू कोटी वृक्ष
ठेवूनी सारे लक्ष्य, नाहीतर व्हाल भक्ष मनी ठेवा, एकच भान रोपटे लावा छान हिरवे होईल रान. जगी मिळे त्यास मान या लक्षवेधी कवितेतून केले. आभार एस.एम. वाकचौरे यांनी मानले.