Breaking News

नगरपंचायतच्या जनता दरबाराला नागरिकांची पसंती


पारनेर / प्रतिनिधी 
पारनेर येथील नागरपंचायतच्या वतीने प्रथमतःच जनता दरबार सोमवारी भरवण्यात आला. या जनता दरबाराला पारनेरच्या नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून आपल्या प्रभागातील प्रश्‍न मांडले. सदर प्रश्‍नांना नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, सर्व नगरसेवक व संबंधित कर्मचारी यांनी उत्तरे देवून आश्‍वासने दिली. पारनेर शहरात ग्रामपंचायतचे नगरपंचायत होऊन गेली अडीच वर्षे झाली. या नगर पंचायतवर आमदार विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती शिवसेनेची सत्ता होती. मात्र अडीच वर्षानंतर विरोधकांना सत्ताधारी नाराज गटांनी मदत करीत ही साथ उलथवून नगराध्यक्षपदी वर्षा नगरे यांची तर, उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत चेडे यांची वर्णी लागली, यानंतर नवीन पदाधिकार्‍यांनी नवनवीन संकल्पना राबवित पारनेर शहराच्या इतिहासात प्रथमच, जनता दरबारचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या जनता दरबारात विविध प्रभागातील नागरिकांनी पाणी, वीज, अतिक्रमण व घनकचरा याबाबत आपल्या समस्या या जनता दरबारात मांडल्या. या समस्यांबाबत संबंधित पदाधिकारी व अधिकार्‍यांनी नागरिकांना उत्तरे दिली असून, या जनता दरबाराबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बांधकाम समितीचे सभापती नंदकुमार औटी, पाणी पुरवठा समितीचे सभापती विशाल शिंदे, नगरसेवक नंदकुमार देशमुख, नगरसेविका शशिकला शेरकर, विजेता सोबले, शालन शिंदे, दिनेश औटी, बापू शिंदे, शंकर नगरे, अर्जुन भालेकर, सचिन नगरे आदी उपस्थित होते. यावेळी तुषार औटी, सुभाष कापरे, सहदेव घनवट, सुभाष औटी, भाऊसाहेब खेडेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, अक्षय देशमाने, प्रवीण औटी, सुनीता कावरे, श्रीकांत चौरेंसह नागरिकांनी पाणी, वीज, आरोग्य, कचरा, अतिक्रमण, लघुशंकागृहे व गटार योजना आदी प्रश्‍न नरपंचायतसमोर जनता दरबारात मांडली. याबात पुढच्या जनता दरबारापर्यंत या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासन संबंधितांनी यावेळी दिले.