Breaking News

स्पर्धेत टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही : प्रा. साहेबराव दवंगे


कोपरगाव शहर प्रतिनिधी :

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञानापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. आपली आर्थिक परिस्थिती गरिबीची असली तरी तुमच्यात जर शिक्षण घेण्याची जिद्द, चिकाटी असेल तर तुम्हाला मोठे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मात्र यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.

शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रगण्य असणाऱ्या साई गोदा प्रतिबिंब प्रतिष्ठानच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल देवरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष बालाजी आंबोरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष राहुल देवरे, कार्याध्यक्ष बालाजी आंबोरे, शांताराम शिनगारे, डॉ. वैभव उबाळे, उपाध्यक्ष शिवाजी धनाड, सचिव विशाल शिनगारे, पत्रकार शाम गवंडी, संजय भवर, अनिल दिक्षित, विशाल झावरे, तुषार कोतकर, सोनल फडे, सनी काळे, वरूण आढाव, चेतन कुक्कर, सुमित गवारे, कुणाल वाणी, अक्षय मोरे, अर्जुन पवार, भूषण दाभाडे, अमोल लाड, ईश्वर साटोटे आदींसह प्रतिष्ठानचे सभासद शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले. बालाजी आंबोरे यांनी आभार मानले.