Breaking News

भाजपच्या ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर विनयभंगासह अट्रासिटी चा गुन्हा दाखल


श्रीगोंदा/ प्रतिनिधी/-श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या पती महादेव गजाबापू दरेकर याने गावातील विवाहित अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगासह अट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वांगदरी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या यांचे पती महादेव गजाबापू दरेकर याने काल दि ८ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यपान केले. आणि त्या नशेतच जोंधळबाईच्या माळावर एक अंगणवाडी सेविका कामावरून घरी जात असताना निर्जन जागी तिची स्कुटी अडवली.आणि तिला म्हणाला की,माझ्या घरी जाऊन आधारकार्ड आणि इतर माहिती मागू नकोस. 

असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत तिच्या अंगावरील साडी ओढली. आणि तिला लज्जा उत्पन्न असे वर्तन करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत तिच्या डाव्या कानातील सोन्याचे वेली टॉप्स गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 याबाबत महादेव गजाबापू दरेकर (रा. वांगदरी ता श्रीगोंदा)यांचेवर अनुसूचित जाती -जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अट्रासिटी व विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मध्यरात्री आरोपीस अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे करत आहेत.