मुळाला २५००भाव द्यावाच लागणार; आमदार मुरकुटे.
तालुक्यातील दिघी येथील सभा मंडपाच्या भूमीपूजन प्रसंगी आ. बाळासाहेब मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ औताडे होते. तर जि. प. सदस्य दत्ताभाऊ काळे, प. स. सदस्य अजित मुरकुटे, उपसरपंच दादासाहेब निकम हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्तविक दत्तात्रय निकम यांनी केले.
मुरकुटे म्हणाले की, अंतिम भाव वेगळा आहे मागील वर्षी महाराष्ट्रात ३,४००/- रुपये सर्वात जास्त भाव निघाला. शेजारच्या जिल्ह्य़ात २,६००/- रूपये भाव दिला. यांनी २,३००/- रुपये दिले. त्याच्या अशा पापामुळे त्याना जनतेने घरी बसवले.
माजी आमदारांचा मागील पाच वर्षाचा कारभार व माझा तीन वर्षाचा कारभार जनते समोर आहे. आमच्या गाडीच्या काचा काळया नाहीत. आम्हाला भेटायला मध्यस्थाची गरज नाही. माजी आमदार जनतेचे फोन उचलत नाहीत. त्याच्या कडे पिए राज आहे. पाहतो, करतो, प्रश्न सोडवतो,अशी उडवा उडवीची उत्तरे देतात.
विरोधी म्हणतात आम्ही बोलघेवडे पणा करतो, परंतु चाळीस पन्नास वर्षाचा रखडलेला विकास करायचा आहे. पाच लाखांचा दिघीत सभा मंडप करत आहोत. जळके ते खेडले काजळी रस्त्यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर केला. याच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखान्याच्या माध्यमातून आमच्या दोन पाऊले पुढे जाऊन तालुक्यात विकास कामे करावीत. परंतु असे न करता आम्ही नामदार पंकजा मुंडे यांच्या कडुन मंजूर करून आणलेल्या निधी च्या कामाचे सभापती उदघाटन करताहेत हि लाजिरवाणी गोष्ट आहे.मुळा कारखान्याने भाग विकास निधी टनामागे पन्नास रुपये कपात केली. ह्या पैशातून रस्ते कधी केले तरी का? गेल्या दहा वर्षांचा हिशोब काढला तर, भाग विकास निधीच्या पैशाच्या ट्रका भरतील हा पैसा गेला कुठे ?असा सवालही त्यांनी केला.या कार्यक्रमास परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते