आपधूपमध्ये रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सुपा / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील निर्मलग्राम आपधूप येथिल श्री मंगलमुर्ती सार्वजनिक वाचणालयाच्या वतीने पहिली ते बारावी व विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर-श्रीगोंदा विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, पारनेरचे गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे व पनवेलचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे उपस्थित होते.
यावेळी आपधूप शाळेतील बदली झालेले, शिक्षक अंबादास तांबे, मनिषा ताजवे यांचा सन्मान करण्यात आला, तसेच नव्याने रूजू झालेले शिक्षक सचिन पराडे यांचाही सन्मान करण्यात आला. गावातील पहिली पोलिस झालेल्या शितल गवळी हिचाही प्रसंगी सन्मान करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी वाचनालयाच्या ज्ञानकुंभ या स्पर्धा परिक्षा विभागासाठी 5 हजार रुपयांच्या पुस्तकांसाठी देणगी जाहीर केली.आपधूपचे सुपूत्र व मुंबईचे अप्पर जिल्हाधिकारी बन्शी गवळी यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. यावेळी सरपंच संगिता सोनवणे, उपसरपंच नामदेव गवळी, माजी सरपंच जयसिंग गवळी, किसन गवळी, सुभास गवळी, रेवजी गवळी, गोकूळ गवळी, संतोष गवळी, प्रकाश गवळी, डॉ. रमेश गवळी, रामदास कसबे, सुकदेव वेताळ, केंद्र प्रमुख बाळासाहेब साबळे, मंडलाधिकारी नंदकुमार साठे, कामगार तलाठी कुसमुडे, सुनिल पठारे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेंद्र शिंदे, ग्रंथपाल संतोष गवळी, अनिल झंजाड, राजकुमार गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव सुरेश सोनवणे यांनी केले. तर सुत्रसंचालन अध्यक्ष भाऊसाहेब गवळी यांनी केले तर आभार योगेश गवळी यांनी मानले.
