Breaking News

संजीवनी पॉलीटक्निकच्या 17 विद्यार्थ्यांची नैनको मध्ये निवड


कोपरगाव / श.प्रतिनिधी
संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत करण्यासाठी विविध कंपन्यांनी भरघोस प्रतिसाद दिला असुन, रांजणगाव (ता. शिरूर ) येथिल एम.आय.डी.सी. मधील नैनको एक्झिम प्रा. लिमिटेड या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे उत्पादने करणार्‍या, कंपनीने संजीवनी पॉलीटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या 17 विद्यार्थ्यांची नोकर्‍यांसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी दिली. 
प्रा. मिरीकर यांनी सांगितले की, निवड झालेले सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असुन, ज्यांना नोकरीची गरज आहे, त्या सर्वांना संस्थेच्या प्लेसमेंट विभागामार्फत नामांकित कंपन्यामध्ये नोकर्‍या मिळवुन देण्याचा व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न असतो. नैनको या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रविण धनाड, आकाश वराडे, अश्‍विनी गायकवाड, कल्याणी गव्हाणे, सुविधा आबक, सोनम होले, चारुशीला वाघ, कुणाल जगताप, राजश्री वाकचौरे, उत्कर्षा वाणी, हुजेफा सय्यद, मयुर गडाख, योगेश शेळके, चंचल लकारे, दीपाली सोनी, श्रध्दा दैतुले व कांचन परदेशी यांचा समावेश आहे. या सर्व विध्यार्थ्यांना प्रा. डी.बी.बोरसे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.