Breaking News

प्रा. गोर्डे यांना शाहू महाराज पुरस्कार जाहीर


राहाता : तालुक्यातील केलवड गावात असलेल्या नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्रा. लक्ष्मण गोर्डे यांना कर्नाटक राज्यस्तरीय शाहू महाराज पुरस्कार गौरव पुरस्कार नुकताच करण्यात आला. कर्नाटक येथील शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक सेवा संस्थेकडून दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय काम कणा-यांना हे पुरस्कार देण्यात येतात. येत्या रविवारी [दि. १५] कर्नाटक राज्यातील बेडकीहाळ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. गोर्डे यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.