विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा : सांगळे
प्रवरानगर प्रतिनिधी
प्रामाणिकपणा, नम्रता आणि आपल्या अंगी असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन या नितिमूल्याचा स्विकार करून विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संजीवनी समुहाचे संचालक ज्ञानेश्वर सांगळे यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये ‘नैतिक मूल्यांची जोपासना’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य सयराम शेळके, के. टी. अडसूळ, एम. एस. जगंधाने आदी उपस्थित होते. यावेळी साई ब्रम्हानंद मंचाचे संचालक रविंद्र पिंगळे यांनी गीतगायनातून विद्यार्थ्यांना नितीमूल्यविषयी संदेश दिला.
यावेळी बोलतांना सांगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुटुंबाची परिस्थिती ओळखून वर्तन करण्याची आवश्यकता आहे. आई, वडिलांच्या कष्टाचे फलित व्हावे, ही जाणीव मुलांमध्ये असावी. शालेय जीवनामध्येच या मुलांना जागृत होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीमध्ये यश कसे संपादन करता येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
