Breaking News

सुबोधकुमार जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त राज्याच्या महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर


मुंबई : पोलीस आयुक्तपदी 1985 च्या बॅचचे आयपीएस सुबोध कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. तर राज्याच्या महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले. यावेळी पोलिस दलामार्फत मोठ्या आदराने आणि दिमाखदार सोहळ्याने त्यांना निरोप देण्यात आला. फुलाने सजवलेल्या एका गाडीतून माथूर यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांच्या बँड पथकाने वादनही केले.
जयस्वाल 55 वर्षांचे असून त्यांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षे बाकी आहेत. तर बर्वे पुढल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होतील. राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याप्रमाणेच जयस्वाल हेही फारसे प्रसिद्धीत नसलेले आयपीएस अधिकारी आहेत. तसेच, दिल्लीतील भाजप नेत्यांशी असलेली जवळीक आणि वादग्रस्त नसलेली कारकीर्द हे जयस्वाल यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. आज राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभही करण्यात आला. विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून वर्णी लागली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी जयस्वाल यांच्या नावाची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. मुंबई पोलीस आयुक्त या पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशातही आहे. मुंबई पोलीस दलात आजवर काम केलेल्या आणि काम करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कर्तृत्वाने मुंबई पोलीस आयुक्त पदाला आज जगभर मान दिला जातो. यामुळे या नियुक्तीबाबत मोठी चर्चा होती. तसेच, संजय बर्वे, परमबीर सिंग, रश्मी शुक्ला, 1986 च्या बॅचचे एस. पी. यादव, संजय पांडे, 1987 च्या बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी कनकरत्नम, हेमंत नगराळे, 1988च्या बॅचचे रजनीश शेठ, के. व्यंकटेशम हेही या पदासाठीच्या स्पर्धेत होते.