दहा राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
दिल्ली : शनिवारी हवामान विभागाने 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच जम्मु आणि काश्मीरच्या बऱयाच भागात पडणा़र्या सतंतधार पावसामुळे झेलम आणि तावी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन या पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी तातडीने आपातकालीन बैठक बोलावली आहे. हवामान विभागाच्या मते शनिवारी आसाम, मेघालय, उत्तराखंड, कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्येही जोरदार पाऊस होऊ शकतो. 2 जुलैनंतर मैदानी क्षेत्रातील आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण घटले जाऊ शकते. उत्तर-पश्चिम भारतात दोन ते तीन दिवसात चांगले पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेकरुंना जम्मूमधील भगवती शहर बेस कॅम्प येथेच थांबवण्यात आले होते. अधिकार्यांनी सांगितले की भगवतीनगर आणि अन्य शिबिरात सुमारे 5,000 प्रवासी आहेत. जम्मूच्या पुढे हवामान खुले झाल्याने उधमपूर येथे अडकलेल्या 2032 भाविकांना पहलगामकडे रवाना करण्यात आले आहे. यात्रेकरूंना बालटालच्या मार्गाने जाण्यास परवानगी देण्यात आली.