'देशातील महिला नव्हे कॉंग्रेस असुरक्षित'
मुंबई
देशातील महिला असुरक्षित नाही तर या देशातील कॉंग्रेस असुरक्षित झाली आहे. म्हणून देशातील जनेतेमध्ये असुरक्षितचे वातावरण निर्माण करून आपली खुर्ची आणि नेतृत्व सुरक्षित करीत आहेत, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. यावेळी त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्या या अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कटींग आणि सेटींग करणा-या नाहीत असा टोलाही लगावला.