Breaking News

प्रयोगशील शिक्षकच विद्यार्थी घडवतात - डॉ. अरुण पवार


दहिगाव ने/ प्रतिनिधी  

आजच्या डिजिटल शिक्षणातही विद्यार्थ्यांना विविध प्रयोगशील शिक्षणाची गरज असुन शिक्षकांनी त्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे. प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थी प्रयत्नशील असतो आणि त्याच वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगातून शिक्षण दिले पाहिजे कारण प्रयोगशील शिक्षकच विद्यार्थी घडवतात असे प्रतिपादन डॉ. अरुण पवार यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना गावकर्‍यांच्या वतीने सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना साई फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. अरुण पवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, माजी मुख्याध्यापक सावता गादे, कडूबाळ घुले, भारत घोडके, लक्ष्मण काशिद,
सुरेश घाणमोडे आदी उपस्थित होते. यावेळी या शाळेतील बदली झालेले शिक्षक राजेश साबळे, मुख्याधापक चंदाराणी डिंबर, सहशिक्षक सुभाष शेटे, महेश शेळके, रंगनाथ गुंजाळ, रतनबाई महांडुळे व मंगल मुळे यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. समाजात शिक्षकांना आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. प्रशासकीय सेवेत अनेक शाळेत ज्ञानदान तुमच्या हातून होते. या सेवा काळात गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक आदर्श शाळा बनवन्याचा ध्यास शिक्षकांनी घ्यावा. असे मत उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संगिता भुसे यांनी केले. तर सुत्रसंचालन रामेश्‍वर जाधव, व आभार माजी मुख्याध्यापक सावता गादे यांनी व्यक्त केले.