डॉ. संदिप ससे यांची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती
भाविनिमगाव प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. संदिप ससे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा नेमणुक आदेश ससे यांना प्राप्त झाला असुन त्यांनी नुकताच आरोग्य केंद्राचा पदभार स्विकारला आहे.
भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत भातकुडगांवसह भायगाव, गुंफा, सामनगाव, लोळेगाव, मळेगाव, वडुले ताजनापूर, खुंटेफळ, बोडखे, दहिफळ नवे, दहिफळ जुने, लाखेफळ, विजयपूर या चौदा गावाचा समावेश आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता बोरसे यांची पुण्याला बढती झाल्याने रिक्त वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ.संदीप ससे यांची प्रशासनाने नेमणूक केली आहे. डॉ. ससे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्विकारून कामकाजास सुरुवात केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मिलिंद कांबळे, अर्जुन वाघमोडे, सतीश जाधव, श्रीमती रोहिणी सुरवशे, बनकर मिलका, मंदाकिनी भोसले, प्रदीप लाळगे, मंदाकिनी सरोदे, शिवाजी वेताळ, सुधाकर वाहूळ, संगिता कचरे, गोडसे याच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिक्रिया
कोरडा दिवस पाळा - सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी पाणी साचले जाते. साठलेल्या पाण्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने परिसराची स्वच्छता राखून डबके साचणार नाही यांची काळजी घेवून आठवड्याचा एक दिवस शनिवारी कोरडा दिवस म्हणून पाळावा. डॉ.संदिप ससे-वैद्यकिय अधिकारी,भातकुडगाव
