Breaking News

लोहगाव विमानतळ विस्तारीकरण कामाची खा.अनिल शिरोळे यांनी केली पहाणी


पुणे, दि. 19, मार्च - लोहगाव विमानतळमधील विस्तारीकरण आणि अन्य विविध विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी संबंधी पाहणी करण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी लोहगाव विमानतळ येथे बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी विमानतळ संचालक अजय कुमार, पुणे महानगरपालिकेच्या पाठ विभागाचे राजेंद्र राऊत, सत्यजित थोरात आदि उपस्थित होते. या बैठकीदरम्यान लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण, विमान उड्डाण संख्येत वाढ तसेच विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समांतर रस्ता निर्मिती यासह विविध विषयांवर चर्चा शिरोळे यांनी संबधिक अधिकार्‍यांशी केली. त्यातील अडचणी, समस्या जाणून घेतल्या. बैठकीनंतर शिरोळे म्हणाले, आजच्या बैठकीमध्ये केंद्रीय पायाभूत समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी ह्यांच्या समवेत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरण संबंधी पत्रव्यवहार झाला आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीदम्यान घेतलेल्या विविध निर्णयांच्या वेळेत तसेच यशस्वी’ अंमलबजावणीसाठी पुढील काळात देखील अशा प्रकारची प्रत्यक्ष पाहणी आणि बैठक घेणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.