Breaking News

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महामोर्च्यात शिक्षक भारती उतरणार- सुनिल गाडगे


पारनेर/प्रतिनिधी /- राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा महामोर्चा २२ फेब्रुवारी२०१८ मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे. या महामोर्च्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना उतरणार आहे. शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या सरकारकडे पडुन आहेत. त्या सोडविल्या जाव्यात यासाठी या महामोर्चात शिक्षक भारती संघटना प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होणार आहे, अशी मााहिती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.
यावेळी सुनिल गाडगे बोलतांना म्हणाले की , शिक्षकांना सातवा वेतन आयोग १जानेवारी २०१६ पासून तात्काळ लागु करावा, १ नोव्हेंबर २००५ पुर्वी जे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सेवेत दाखल झालेले आहेत, परंतु १००% टक्के अनुदानीत उशिरा झाल्याने त्यांना जून्या पेन्शन योजने पासून वंचित ठेवले आहे, अशा सर्व कर्मचार्‍यांना व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी, १ नोव्हेबर २००५ पासून नियुक्त कर्मचारी शिक्षकांसाठी डी.सी.पी.एस./एन.पी.एस.बंद करुन 1982 ची मुळची पेन्शन योजना लागु करावी, ती २३ ऑक्टोबर २०१७ च्या वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा शासन निर्णय रद्द करावा.

आज तातडीची सहविचार सभा शिक्षक भारतीच्या कार्यालयात आयेाजित करण्यात आली होती. या बैठकीच्या वेळी शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष आप्पाहसाहेब जगताप, नाशिक विभागाच्या अध्यक्षा मिनाक्षी सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, श्रीकांत गाडगे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, मोहम्मद समी शेख, जॉन सोनवणे, अशोक धनवडे, विजय लंके, शरद धोत्रे, सुनिल जाधव, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, विभावरी रोकडे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे,जया गागरे, बेबीनंदा लांडे, वैशाली आहेर,विलास गाडगे, प्रदिप रुपटक्के, अरविंद आचार्य, सुनिल जाधव, रमेश कोलते, अंबादास जाधव, पोपट नवले आदी उपस्थित होते.