Breaking News

पीएमपीएमएलच्या तिकीट दरात वाढ ?

पुणे, दि. 01, जुलै - तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलला डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे दररोज नुकसान सहन करावे लागत आहे. या दरवाढीमुळे पीएमपीएमएलच्या तोट्यात प्र तिदीन साडेचार लाखाची भर पडत आहे. पीएमपीएमएलची ही आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यासंदर्भात चाचपणी सुरु असून लवकरच दरवाढ होणार असल्याचे संकेत पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिले. 

सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात डिझेलवर चालणा-या 900 हून अधिक तर सीएनजीवरील 571 बसेस आहेत. तर 653 भाडेतत्वावरील बसेस सीएनजीवर धावतात. डिझेलवर धावणा-या काही बसेस बंद आहेत. तर मागील काही दिवसात 130 मिडी बस दाखल झाल्या आहेत. सध्या पीएमपीला दररोज सुमारे 37 हजार 500 लिटर डिझेल लागते. त्यासाठी सुमारे 24 लाख रुपये मोजावे लागतात. मागील काही महित झालेल्या दरवाढीमुळे पीएमपीला मिळणा-या डिझेलच्या दरात 4.09 रुपयांचा फरक पडला आहे.