Breaking News

प्लास्टिकबंदी आणि कारवाई ’ विषयावर सोमवारी महाचर्चा

पुणे, दि. 02, जुलै - पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ’ प्लास्टिकबंदी आणि कारवाई ’ विषयावर सोमवारी (दि. 2) पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महानगर परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी पत्रकाद्वारे दिली.सोमवारी संध्याकाळी सहा वाजता होणार्‍या या महाचर्चेत आमदार नीलम गोर्‍हे, आमदार विजय काळे, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अ‍ॅड. असीम सरोदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, प्रदूषण नियामक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त सुरेश जगताप, स्टेशनरी -कटलरी असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर, हॉटेल असोसिएशनचे जवाहर चोरगे, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नितीन पटवा, रिटेल व्यापारी असोसिएशनचे सचिन निवंगुणे सहभागी होणार आहेत.महाचर्चेला उपस्थित राहण्याचे आवाहन अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी आवाहन केले आहे.