Breaking News

सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने भक्तांनी दिली ग्रंथांची भेट


नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा बुद्रुक शिवारात सुरेगाव रस्त्यावर गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांनी सुरू केलेल्या सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान येथे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये सुमारे चाळीस हजार रुपये किंमतीचे ग्रंथ यावेळी झालेल्या कार्यक्रमात भेट देण्यात आले. जीवनातील यशस्वी वाट दाखविणारे पुस्तक हे मोठे माध्यम असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील जगन्नाथ महाराज पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास मुंबई येथील भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील, उद्धव महाराज मंडलिक, तहसीलदार उमेश पाटील, पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे, ग्रंथदाते पाटील, मुंबई येथील नरेश पाटील, सुरेश प्रधान, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे, प्रा. सतीश मुळे व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांचे उपस्थितीत ग्रंथालयाचे उदघाटन तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रबोधन प्रतिष्ठानचे प्रमुख गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात पसायदान विद्या मंदिर सूरु केले असून येथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण दिले जात असल्याने हे ग्रंथालय व त्यात उपलब्ध ग्रंथसंपदा ही त्यांची भावी जीवनासाठी शिदोरी ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्धव महाराज व पसायदान विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब झिने यांच्याकडे ग्रंथालयासाठी सुमारे चाळीस हजार किंमतीचे ग्रंथ प्रदान करण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते पी. आर.जाधव, नगरसेवक अँड.बापूसाहेब गायके, जेष्ठ विधीतज्ञ अँड.के.एच. वाखुरे, राजेंद्र चौधरी, आण्णासाहेब पटारे, पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे प्रमुख बाळासाहेब घुगरकर, बाबा लबडे, ग्रामसेवक सुदामराव बनसोडे, हरीश पाटील, मूर्तिकार बजरंग ईरले, पवन खारीक, पंडितराव थोरात, बेहळे गुरुजी, संतसेवक रखमाजी नाचन, नंदकुमार गायके शिक्षक सागर वांढेकर, सागर महाराज अधाने, नानासाहेब पाटील, शिक्षिका रेणुका मते, महेश गवळी यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे व तहसीलदार उमेश पाटील यांनी उद्धव महाराजांनी सुरू केलेल्या अध्यात्मिक संकुलाला शुभेच्छा दिल्या . संतसेवक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक बाळासाहेब झिने यांनी आभार मानले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात जगन्नाथ महाराज पाटील यांनी प्रतिष्ठानने सुरू केलेले विद्यालय हे विद्यालय नसून भावी पिढीसाठी ऊर्जालय असल्याचे गौरवोदगार काढले. विज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असली तरी अध्यात्म हे कुठे जायचे हे सांगेल तर पुस्तक हे मार्ग दाखवेल असा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला.