Breaking News

लांडेवाडी आश्रमास 71 हजाराचा रथ सुपूर्त; तरुणांनी केला संकल्प पूर्ण


सोनई/प्रतिनिधी 

लांडेवाडी-पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने विठुरायाच्या भेटीसाठी भाविक भक्तासाठी लांडेवाडी येथील सामाजिक बांधिलकी म्हणून कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य अशोक साळवे, लांडेवाडी वि.का.संस्थेचे चेअरमन संजय दरदले, माजी उपसरपंच देविदास लांडे, दिलीप तांदळे, ग्रा. पं.सदस्य तात्यासाहेब लांडे, डॉ. माऊली दरंदले , शिवाजी दरदले, संतोष तांदळे या तरुणांनी एक महिन्यात गावातील आश्रमास काहीतरी नवीन गोष्टी देण्याचा संकल्प म्हणून लक्षात आलं ते म्हणजे चक्क 71 हजाराचा आलूमिनियमचा आकर्षक रथ सुपूर्त करून अवघ्या एक महिन्यात संकल्प पूर्ण केला आहे.
गंगापूर(जि. औरंगाबाद) येथून कलाकृती व वास्तू विशारद सोमवंशी यांनी हा रथ छोटासा व आकर्षक असा बनवला आहे. त्यासाठी 71 हजार रुपये खर्च आला आहे . तो रथ लांडेवाडी येथील वै. माधावबाबा लांडेवाडी आश्रमास देण्यात आला. विधिवत पूजा देवगड संस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते देवगड येथे करण्यात आली. याप्रसंगी आमदार बाळासाहेब मुरकुटे , समवेत बाळू महाराज कानडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.