गांवच्या विकासासाठी राजकीय मतभेद थंड
शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव नेवासा राजमार्गा लगत असणार्या बक्तरपूर गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांसह गाव पुढार्यांने चर्चिलेल्या विकास कामाच्या प्रश्नाला अखेर ग्रामपंचायतीने सोशल मीडियावर दिलेल्या स्पष्टीकरणामुळे गावातील राजकीय मतभेद थंड झाले असले तरी, काहींची राजकीय नशा मात्र उतरली आहे.
तालुक्यातील अवघ्या 1000 लोकसंख्या असलेल्या गावाने शेवगाव तालुक्यात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. गावांमध्ये यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांच्या स्थानिक निधीतून बक्तपूरचाच एक भाग असणार्या वस्तीवर सभामंडप बांधण्यात आला. त्यानंतर उपेक्षित असणार्या गावाकडे राजकीय नेत्यांचे विकासासाची चक्रे गतीने फिरु लागली. त्यातच विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांनी गावठाणवर असणार्या हनुमान मंदिरासमोर सभा मंडप देण्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे एक हजार लोकसंख्या असलेल्या गावाला ग्रामपंचायत इमारत देण्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी जाहीर केले व त्यानंतर गावापातळीवर कोपरखळ्या राजकारणाला उत आला. तर काहींनी आमच्या सारखे आम्हीच म्हणून तोरा मिरवला तर, काहींना राजकीय बड्या नेत्यांकडून आलेल्या वादळाला तोंड द्यावे लागले. त्यातच खुलाशांना तोंड देतांना मात्र दमछाक झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व बक्तरपूरचे सरपंच राहूल बेडके यांनी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने पडदा टाकून ग्रामपंचायत ही जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या निधीतून होणार तर हनुमान मंदिर समोरील सभामंडप हा आमदार मोनिकाताई राजळे निधीतून होणार आहे. गावच्या विकासासाठी स्वयंघोशीत गाव पुढार्यांने लुडबूड करू नये. गावच्या ’राजवैभवात’ भर पडेल त्यामुळे गावचा विकास होईल असे मत सोशल मीडिया वर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.
गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन गावचे नागरिक स्वीकारतील परंतु विकासात अडथळा ठरणार्या व्यक्ती मात्र या आवाहनाला प्रतिसाद देतीलच असे नाही ? हा येणारा काळ ठरवणार आहे . तर काही जाणकारांच्या मते, राजकीय पक्षाशी प्रामाणिक कार्यकर्त्यांची मात्र गळचेपी झाली आहे.त्यामुळे विकास कामात सर्वांनी एकसंघ राहावे असे मत अनेकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
