राज्याच्या विधानसभेत शुक्रवारी अनोखे चित्र पाहायला मिळाले. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आणि विरोधकांनी मिळून सभागृहाचे कामकाज तीन वेळा बंद पाडले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाणार संदर्भात दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. यावर शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 10 मिनीटे कामकाज तहकूब केले होते. त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पाटील यांच्या स्थगन प्रस्तावाला समर्थन देत शिवसेनेला राजकीय मुद्दा न करता कोकणच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी एकत्रित वेलमध्ये येऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
नाणारच्या मुद्द्यावर शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:45
Rating: 5