Breaking News

नाणार प्रकल्पावरून विधानसभेत खडाजंगी नाणारसाठी जमीन देणार्‍यांची नावे जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात आता राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या विधानावरून वादळ उठले आहे. क ोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या नाणार शुद्धीकरण प्रकल्प लादणार नाही. चर्चेतून तोडगा काढणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. या प्रकल्पाला काहींचा विरोध आहे तर काही लोकांचे समर्थन आहे, असे सांगत अडीच हजार हेक्टर जमीन देण्याबाबत लोकांनी सरकारला पत्र दिली आहेत. पाच ते साडेपाच हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. मात्र लोकांच्या यासंदर्भातल्या गैरसमजुती दूर केल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी सभाग ृहात सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री सभागृहात खोटे बोलत असल्याचा आरोप वालम यांनी केला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री सभागृहात खोटे बोलत आहेत. ज्या अडीच हजार हेक्टर जमीन मालकांची त्यांना परवानगी मिळाली आहे, त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावे जाहीर करावीत, असे आव्हान कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिले आहे. आमचा प्रखर विरोध आहे. कोणी जमिनी दिलेल्याच नाहीत. येथील 95 टक्के ग्रामस्थ विरोधात आहेत. मग यांना संमतीपत्र दिली कोणी, असा सवाल वालम यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्यांची संमती मिळाली आहे त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच जी काही लोकांची संमती यांना मिळाली आहे, ती संमती दलालांची असल्याचा आरोपही वालम यांनी केला आहे.