वंचितांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार ! भारीपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिपादन संविधान टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची
सत्ताधारी बनणार, संविधान वाचविणार, आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार
अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्यातील आलुतेदार-बलुतेदार, धनगर, माळी, भटके विमुक्तांमधील 25 जाती, आदिवासी, भिल्ल व मुस्लिम समाज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही सत्तेपासून वंचित आहेत. त्या सर्व वंचित घटकांनी एकत्र येऊन सत्ता काबीज केली पाहिजे, व आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहूजन आघाडीचे नेते, भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. टिळक रोडवरील माऊली मंगल कार्यालयात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी आ. पद्श्री लक्ष्मण माने, अशोक सोनवणे, अमित भुईगळ अॅड. विजयराव मोरे, माजी आ. हरिभाऊ भदे, प्रा. किसन चव्हाण, अॅड. डॉ. अरुण जाधव आदी यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आंबेडकर पुढे म्हणाले की, सत्ताधारी बनणार आणि संविधान वाचविणार अशी घोषणा देत संविधान टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. तो व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे. सत्तेचे सामाजीकरण व सार्वत्रिकरण झाले पाहिजे सत्ताधारी होऊन आपणच आपले प्रश्न सोडविले पाहिजेत. गेली 70 वर्षे आपण सत्ताधार्यांकडे आपले प्रश्न सोडविण्याची मागणी केली मात्र सत्ताधार्यांना पाझर फुटला नाही त्यामुळे ही भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. त्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन वर्गांतील माणसांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी समस्त बहुजन समाजाची आहे. त्यावेळी उमेदवारांच्या जातींची लोकसंख्या विचारात न घेता परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी व्हावे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील 5 जणांची हत्या केवळ भटक्या समाजाला हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन, गाव, जमीन नसल्यामुळे झाला. त्यांच्या कुटंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
वंचित बहुजन आघाडीचा रस्ता खडतर आहे. इथे भांडणे लावण्याचा प्रयत्न होईल. त्याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यात आणि जिल्ह्यात स्वतंत्र जाहीरनामा असेल राज्याच्या जाहीरनामा सर्वांना समान असेल तर जिल्ह्याच्या जाहिरनाम्यामध्ये जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न असतील. वं चित असलेल्या समूहाला कसा न्याय देता येईल ते या जाहिरनाम्याचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी अशोक सोनवणे, सुनील शिंदे, प्रा. किसन चव्हाण, अॅड. डॉ. अरुण जाधव, अरविंद सोनटक्के, अनंत लोखंडे, अर्षद शेख, नारायण गडई, शिवाजी गांगुर्डे, सुधाकर आव्हाड, काशिनाथ चौघुले, मौलाना नदवी, मीरा शिंदे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. मीरा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संवाद यात्रेत आंबेडकर यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. त्याच बरोबर जिल्ह्यातील ख्रिश्चन, मुस्लिम व नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा केली.
उमेदवारांच्या जातींची लोकसंख्या विचारात घेऊ नका..
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन समाजातील छोटया छोटया मायक्रोस्कोपिक जातींच्या माणसांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी समस्त बहुजन समाजाची आहे. त्यावेळी उमेदवारांच्या जातींची लोकसंख्या विचारात न घेता परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
वारकर्यांनी भिडे विरोधात तक्रार करा
इथल्या सत्ताधारी पक्षावरचा आमचा विश्वास उडाला आहे, असे ते म्हणाले. मनोहर भिडेने पंढरपूर येथे केलेल्या वादग्रस्त विधानाचा आंबेडकर यांनी तीव्र शब्दात निषेध करून टीका केली. संभाजी भिडे गुरुजीला सत्ताधार्यांचे अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्तव्य ते करणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा विरोधात कुठलीही कारवाई करणार नाहीत. सर्व वारकर्यांनी मनोहर भिडे वक्त्याव्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले.