दरोड्याच्या तयारीत असलेले पाच आरोपी जेरबंद
नेवासा ( शहर प्रतिनिधी )
खडका फाटा ते सलाबतपूर रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस कर्मचारी महेश कचे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुरूवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी सहायक पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सलाबतपुर रोडवर एक इनोव्हा गाडीजवळ चार ते पाच इसम चोरी करण्याच्या उद्देशाने बसलेले आहेत. अशी माहिती मिळताच सपोनि गोर्डे, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे व पथक खाजगी वाहनाने सलबतपुर रोडवरील आडवी चारीजवळ एक इनोव्हा कार क्र. एम.एच.05 बी.एस. 4716 ही दिसून आली. गाडी जवळ पाच इसम संशयास्पद हालचाली करतांना दिसून आल्याने त्यांना पथकाने छापा टाकून पकडले. त्यावेळी त्यांची नावे विचारले असता त्यांनी सुजित भिकन देवकुळे(वय-26 रा.हरेगाव ता.श्रीरामपूर), संदीप एकनाथ ढगे (वय-26 रा.खोकर ता.श्रीरामपूर), रोहन विलास शिंदे (वय-25 रा.पंचशीलनगर.चाळीसगाव), अभिजित मधुकर जोंधळे (वय-25 रा.संगमनेर रोड श्रीरामपूर), दीपक बाबासाहेब शेटे (वय-23 रा.संजयनगर.श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक चोपर, एक लोखंडी रॉड, दोन लाकडी दांडके, तीन दोर्या, सात सुतळी अॅटमबॉम, डिझेल ड्रम,दोन मोबाइल, पाच मास्क व इनोव्हा कारसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर टोळीकडून भविष्यात घडणारे अनेक गुन्ह्यांवर प्रतिबंध बसणार असून त्यांच्याकडून आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोर्डे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, बाबासाहेब लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गीते,
सुहास गायकवाड, महेश कचे, संभा गर्जे, संदीप म्हस्के,अंबादास गीते यांनी पार पाडली.
