Breaking News

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने वनपरीक्षेत्रकास निवेदन


पाथर्डी 

तालुक्यातील शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात रोपवाटिका उपलब्ध करून द्यावेत तसेच वनविभागाची गायरान जमीन अनुसूचित व भटक्या समाजाला कसण्यासाठी द्यावी.
वनसंरक्षण सुरु करावे. शहरतील वनदेव पर्यटन स्थळाचा विकास करून कायम स्वरूपी देखभाल करण्यासाठी कर्मचारी नेमावा या मागण्याचे निवेदन भाजपा किसान मोर्चाच्या वतीने वनपरीक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांना देण्यात आले. यावेळी सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे, भाजपा अल्पसंख्यांक आघीडीचे जिल्हा उपाध्यक्ष युसुफ शेख, ता. अध्यक्ष नवाब शेख, युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष नितिन एडके, बाजीराव गर्जे, नवनाथ वाघ , बाबासाहेब वांढेकर, विक्रम बडे , तुकाराम बडे आदी उपस्थित होते.