प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रलंबित असलेले प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन
नेवासा (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पुनर्वसन कार्यालय हे मुळा व जायकवाडी प्रकल्पातील धरणग्रस्तांसाठी मोठी डोकेदुखी झाली असून मुळा व जायकवाडी प्रकल्पला 40-42 वर्ष पूर्ण होत आली आहेत. या प्रकल्पात लाखो एकर शेतजमिनी प्रकल्पग्रस्तांच्या संपादित झाल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांची 40-42 वर्षापासून जमिनी मिळण्यासाठी पायपीट चालू आहे. शासनाने धरणग्रस्ताच्या जास्त जमिनी संपादन करून त्या बदल्यात खूपच कमी प्रमाणात जमिनी शेतकर्यांना दिल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय होऊन उपासमारीची वेळ आली असून जिल्हाधिकारी यांच्या नावाने या जमिनी अजूनही तशाच पडून आहेत. यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र त्यांच्या त्या ठिकाणी आर्थिक व्यवहारासाठी अडवणूक करीत असल्याचे लेखी निवेदन भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश कर्डिले यांनी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना दिले असून यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी तत्काळ अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तच्या पुनर्वसनाचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन अधिकार्यांची तातडीची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे नेवासे तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे , भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डिले यांनी नागपूर येथे चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
