Breaking News

गणेश पवार यास सुवर्णपदक


नेवासा (प्रतिनिधी) 

शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील मूळचा रहिवाशी असलेल्या गणेश पवार याने कानपुर येथे आय.आय.टी.एम.टेक मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुवर्णपदक पटकाविले.
कानपुर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गणेश पवार यास सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गणेश पवार हा दहिगावने येथील सरपंच सुभाष पवार व शोभाताई पवार यांचा चिरंजीव असून त्याच्या या यशाने महाराष्ट्र व जिल्ह्याचीही मान देशात उंचावली गेली आहे.त्याच्या या यशाबद्दल माजी आमदार नरेंद्र घुले , चंद्रशेखर घुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.