Breaking News

मक्तापुरच्या उपसरपंचपदी संगिता कराडे


नेवासा फाटाः प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील मक्तापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगिता खंडू कराडे यांची बिनविरोध निवड झाली. मक्तापुर येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच उज्वला देवदान साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्या संगिता खंडू कराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणुक अधिकारी म्हणून सरपंच बन्यामीन साळवे व ग्रामसेवक संजय वाघ यांनी काम पाहिले. 
यावेळी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेवासा तालुका मार्केट कमीटीचे संचालक अशोकराव कोळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताञय कांगुणे, पं.स.सदस्य रावसाहेब कांगुणे, नामदेव कराडे,ज्ञानेश्‍वर कराडे ,राजेंद्र कोळेकर,नाना घुले,मच्छिंद्र जामदार,भरत काळे,रामकिसन कांगुणे, सरपंच बन्यामिन साळवे, माजी उपसरपंच देवदान साळवे, पोपटराव बर्डे, कल्याण कांगुणे, छबुराव बर्डे, अरूण महानोर, कारभारी कोळेकर, माऊली देवकाते, अनिल लहारे, विलास साळवे, नानासाहेब कराडे, लक्ष्मणराव कराडे, जनार्दन कराडे, अजय कोळेकर, भागचंद साळवे,अनिल कांगुणे, अप्पासाहेब साळवे, बबलु साळवे, पप्पू साळवे, सुभाष साळवे, विठ्ठलराव खताळ, रंगनाथ कराडे, सुनिल कराडे बळिभाऊ महानोर,ज्ञानेश्‍वर काळे, संभाजी कराडे, सरुनाथ महानोर, सचिन महानोर आदी गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.