कोपरगांव वकील संघाच्या निवडणुकीत चुरस
कोपरगाव / श. प्रतिनिधी
कोपरगाव येथील वकील संघाचा अॅड. पुनम गुजराथी यांचे अध्यक्षतेखालील कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, निवडणुकीची घोषणा झाली असून, यात अध्यक्षपदासाठी अॅड. विकास सदाफळ, अॅड. शिरिष लोहकणे यांच्यात लढत होत आहे. तर उपाध्यक्ष (महिला पदासाठी) अॅड. प्रियंका काजळे, अॅड. शितल देशमुख तसेच सचिवपदासाठी अॅड. नितीन खैरनार, अॅड. सतिश बोरूडे यांच्यात लढतीचे अर्ज दाखल झाले आहे. उपाध्यक्ष (पुरुष)पदासाठी अॅड. उत्तम पाईक तर, सहसचिवपदासाठी अॅड. नितीन गिरमे या दोघांचे विरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे समजते. खजिनदार पदासाठी एकाही वकिलाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. वकील संघाची निवडणुकीसाठी कोपरगाव न्यायालय परिसरात माजी खा. अॅड. भिमराव बडदे ग्रंथालयात दि.17 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते दु. 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.