लांडेवाडी ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान
सोनई :
नेवासा तालुक्यातील लांडेवाडी येथील वै. ह.भ.प. माधवबाबा लांडेवाडीकर यांच्या कृपाशीर्वादाने आश्रमातून जाणार्या पायी पालखी दिंडी रथाचे (ता.10) श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीचे गावात ठीक ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. परिसरात जि.प.सदस्य. अशोक साळवे, लांडेवाडी वि.का.से. सोसायटीचे चेअरमन संजय दरंदले, डॉ. माऊली दरंदले, शिवाजी दरंदले, दिलीप तांदळे व पानसवाडी येथील प्रा. रामकीसन शिंदे व पत्नी पद्माबाई शिंदे यांनी विधिवत पूजा व आरती करून स्वागत केले. ह.भ.प. देवराव महाराज लांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिंडीचे प्रस्थान झाले आहे. यावेळी वारकर्यांनी विठू नामाचा जयघोष करत पायी दिंडीत मंडलाधिकारी पारनेर अशोक लांडे, सदानंद शिंदे, राजेंद्र शिंदे, सोन्याबापू सोनवणे, बाप्पू सोनवणे, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब गडाख, सुभाष सोनवणे, आदींसह मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.