महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे मरावाडयात निदर्शने
औरंगाबद, दि. 21, जुलै - महागाई भत्त्यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे मरावाडयात औरंगाबद आणि परभणी येथे एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने झाली.औरंगाबाद येथे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक,मध्यवर्ती कार्यशाळेसमोर निदर्शनं झाली.तर मुख्य बस स्थानकात गदारोळझाला गणवेशही मिळत नसल्याने कर्मचा-यांनी बनियन घालून अंदोलन केले.कामगारांना 1 एप्रिल 2016 पासून 25 टक्के अंतरिम वाढ द्यावी, 1 जुलै 2016 पासूनचा वाढीव 7 टक्के महागाई भत्ता त्वरित अदा करावा यासह अन्य मागण्या होत्या. यावेळी संदीप शिंदे, हनुमंत ताटे यांच्यासह असंख्य एसटी कामगार उपस्थित होते. गेल्या कित्येक दिवसांपासुन एसटी कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्या मान्य न होत असल्याने आज अखेर कामगारांनी आंदोलन केले.