मुलींसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार
राजुर येथील गरीबीचे चटके सोसत असलेल्या, दोनच दिवसापुर्वी राजुर येथील भारमल कुंटुबाला शेतीसाठी बैलजोडी नसतानाही शेतीची मशागत करण्यासाठी घरातील मुलगी व सुनेलाच औतासाठी हातभार लावावा लागला होता. यावर माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर जि. प.चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे तसेच आदिवासी विकास प्रकल्पाच्या अध्यक्षा सुनिता भांगरे आणि राजुर आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी तात्काळ या कुटुंबाची भेट घेत चौकशी केली. या घरातील कर्त्या पुरुषावर मोठ्या मुलीच्या लग्नासाठी बैलजोडी विकण्याची वेळ आल्यामुळे, शेतीची मशागत करण्यासाठी उच्चशिक्षित मुलीला व सुनेलाच बैलांच्या जागेवर औत ओढावे लागले. काळ्या आईची मशागत केल्यावरच, आपल्याला पोटभर खायला मिळणार असल्याने आणि गरिबीला पर्याय नसल्याकारणाने या महिलांनी कसलीही तमा न बाळगता आपल्याच, शेतात बैलजोडीच्या जागी काम करण्याचा निर्णय घेतला होता. अशी माहिती आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या कानावर पडताच या कुटुंबाला त्यांनी लगेच भेट देत, तिनही मुलींच्या लग्नाची जबाबदारी उचलली, तर सुनिता भांगरे यांनीही या कुटुंबाच्या शेतीला आधार मदत करण्याचे आश्वासन दिले.
