Breaking News

केलेल्या विकास कामांची पठाण यांना पोचपावती

जामखेड / ता. प्रतिनिधी । तालुक्यातील राजकीय दृष्टीने आतिशय महत्वाची मानली जाणारी गरडाचे पाटोदा येथिल ग्रामपंचायतीच्या पाटोदाचे माजी संरपच समीर पठाण हे पहिले पाटोदा ग्रामपंचायतचे संरपच होते. आता त्यांच्या मातोश्री चांदबी पठाण यांची संरपचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांचे बंधू गफार पठाण यांनी उपसंरपच पद भुषविले आहे. पठाण यांच्या घरामध्ये पंधरा वर्षे पासून संरपच पद आहे. माजी संरपच समीर पठाण यांनी पाटोदा गावात भरपूर कामे केलेले आहे रस्ता, गटारी, पाणी पिण्यासाठी नागरिकांना सोय, अनेक गोरगरीब लोकांना शासनालावर प्रस्ताव पाठवून घरकुल मंजुर करून आणले, गावात यात्रा व बाजार भरत नव्हता ते त्यांनी नव्याने सुरू केले. गावात त्यांनी चांगले काम केल्या बद्दल नागरिक त्यांना दर पंचवर्षीय निवडून आणतात.
त्यांच्या मातोश्री चांदबी पठाण यांची बिनविरोध संरपच पदी निवड होताच, माजी संरपच समीर पठाण यांच्यावर तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. पठाण यांचे विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले, निवड होताच शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण यांनी त्यांच्या पाटोदा गावी जाऊन सत्कार केला.
अकरा सदस्य असलेली पाटोदा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड नुकताच करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपुर्वी रत्नमाला छगन खटके यांची प्रथम निवड झाली होती. त्यांचा दीड वर्षांचा कार्यकाळ संपला असल्याने पुन्हा दिड वर्षांसाठी अर्चना सिध्दार्थ थोरात यांच्या निवड झाली होती. यानंतर त्यांचाही कार्यकाळ संपल्याने नुकतीच चांदबी मद्देखान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडी दरम्यान उपसरपंच महादेव कदम, माजी उपसरपंच गफ्फार पठाण, माजी रतनताई खटके, अर्चना थोरात, चांगुना पवार, दादा राऊत, सविता माने, दिनकर टापरे, अंबादास पवार, गहिनीनाथ कीरदात आदी उपस्थित होते. यानंतर सरपंच चांदबी पठाण यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच पठाण म्हणाल्या की पाटोदा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन कामे करणार, तसेच पाटोदा येथिल प्रवाशांसाठी निवारा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची शाळा दुरुस्ती करुन नविन इमारत बांधणार आहोत. सुशिक्षित बेरोजगारांना शॉपींग कॉम्प्लेक्स उभारण्यात येईल, तसेच वृक्षारोपण व घर तीथे शौचालय बांधण्यात येईल असे सांगीतले. तर माजी सरपंच छगन खटके यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामे झाली असे सांगितले. यावेळी छगन खटके, पाटोदा गावचे माजी सरपंच समिर पठाण, युवा नेते वसीम कुरेशी, अरुण थोरात, प्रविण गायकवाड, माजी सरपंच जोगेंद्र थोरात, दत्तात्रय निंबाळकर, सादिक शेख, अन्सार पठाण, राजु क्षिरसागर, तंटामुक्त अध्यक्ष सत्तार पानसरे, समिर सय्यद, अरुण आमटे, संतोष टापरे, सर्फराज पठाण, हनीफ पठाण, तय्यब पठाण यांच्यासह पाटोदा गावातील व तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. ए पाचरणे कामगार तलाठी कटारनवर व ग्रामविकास अधिकारी करंगळे यांनी काम पाहिले.