Breaking News

पाटोदा गावात कृषिदुतांचे स्वागत...


जामखेड / ता.प्रतिनिधी 
महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे गरडाचे पाटोदा (ता. जामखेड) येथे सरपंचांसह ग्रामस्थांनी स्वागत केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत मिरजगाव येथील सद्गुरू कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी पाटोदा येथे दाखल झाले. त्यांचा सरपंच जोगेंद्र थोरात, उपसरपंच महादेव कदम, माजी सरपंच समीर पठाण, कृषी सेवक राजु पठाण, अमोल निंबाळकर, अंगद गव्हाने, खंडु कवादे, जाकीर पठाण, माजिद पठाण तसेच याभागातील शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले. कृषिदूत कुणाल चव्हाण, महेश शिंदे, स्वप्निल ढवळे, दत्तात्रय भोसले, श्रीराम ढोबे, प्रकाश जेवे या स्वागताने भारावले. कृषिदूत ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेती संदर्भात नवनवीन तंत्रज्ञान वापरून कशी शेती केली जाते, तसेच आधुनिक पद्धतीने केल्यास होणारे फायदे सांगणार आहेत, सध्या सर्वत्र पेरणी सुरू आहे, नवीन तंत्रज्ञान कसे वापरावे, कमी जागेत जास्त उत्पादन कसे काढावे, याबाबत कृषिदूत मार्गदर्शन करणार आहेत.