Breaking News

ठेकदाराने लाटलेली 6 लाखाची रक्कम भवली....

तालुक्यातील खडकवाडी व बोरवाक रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे न करता देयक तयार करणे, मोजमाप पुस्तिकेत मापे लिहताना तांत्रिक निकषाप्रमाणे न लिहता भराव, घाट, कटींग, मापे लेव्हल घेवून नोंदविणे, आवश्यक असताना टेपने मापाची नोंद करणे, खडीकरणाचे काम 773 मी. करण्याऐवजी 1153 मी. मुरमीकरणाचे काम केले आहे, या कामाच्या ठिकाणी फलक लावला नाही, मात्र कामाचे देयक अदा करण्यात आले, रस्त्याचे अस्तिकरण करणे, ही बाब अंदाजपत्रकात समाविष्ट नसताना व मुरमी क्षेत्रातून रस्ता जात असल्याने मुरमीकरणाची आवश्यकता नसताना मोजमाप पुस्तिकेत नोंदी नोंदवून देयक मंजुरीसाठी कार्यकारी अभियंताकडे सादर केले, या सर्व कामात अनियमतता आढळल्याने शाखा अभियंता बी.डी काकडे यांना निलंबित तर उपअभियंता जे.एम कडाळे यांची श्रीगोंदा येथे उचलबांगडी करण्यात आली. मात्र ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, किंवा काळ्या यादीत टाकले नाही. ठेकेदाराकडुन रक्कम वसुल केली नाही. अधिकारी प्रकरणात अडचणीत आले. 
तालुक्यातील खडकवाडी आदिवासी भिल्ल समाज राहात असलेल्या बोरवाक वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा खर्च न करता 5 लाख 90 हजार 337 रुपये बोगस खर्च दाखवण्यात आला. त्यामुळे या बोगस कामाची तातडीने चौकशी करुन, संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी जि.प. सदस्य काशीनाथ दाते यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडेे निवेदनाद्ववारे लेखी तक्रार केली होती. खडकवाडी ग्रामपंचायतचे सरपंच द्वारकाबाई चिकणे व उपसरपंच ज्ञानदेव गागरे यांनीही जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्ववारे लेखी तक्रार केली होती. या पाठीमागे पारनेर पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकर्‍यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली हेाती. त्यामुळे या संबंधित अधिकारी यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी मंगळवार दि. 12 जून रोजी जि.प.समोर उपोषण करण्यात आले होते. त्यामुळे जि. प. च्या सार्वजनिक विभागाने दखल घेवून कारवाई करण्यात आली आहे.

बोरवाक रस्ता काम न करता ठेकेदाराने बिल काढले. या ठेकेदारावर मात्र कारवाई करण्यात आली नाही. किंवा त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. यात मात्र अनियमतता झाल्याचा ठपका ठेवून शाखा अभियंता व उपअभियंता बळी पडले.