Breaking News

भाजप सरकाचा ‘मेक इन इंडिया’ फसवा : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी

भाजपा सरकारने सत्तेवर येताच अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. रोजगारनिर्मितीसाठी मोठा गाजावाजा करत सुरु केलेला ‘मेक इन इंडिया’ हा कार्यक्रम पूर्णत : फसवा आहे, अशी टिका माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

यासंदर्भात आ. थोरात यांनी संरक्षण व्यवस्था व इतर महत्वाच्या खात्यांबाबत एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यात म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाची घोषणा केली आणि खाजगी क्षेत्राला यापुढे संरक्षण सामुग्री उत्पादनात मुक्त प्रवेश असेल, असे सांगितले. तेव्हा कपिल काक यांनी त्याचे मनसोक्त स्वागत केले होते. भारतातील शस्त्रास्त्र कारखाने आता जुनाट झाले आहेत. संरक्षण खात्याकडे आधीच पैशाची चणचण असते. तिथल्या लोकांचे गलेलठ्ठ पगार देत बसायचे आणि दारुगोळा बनवण्याऐवजी सैनिकांचे गणवेष तिथे शिवत बसायचे, हा आतबट्ट्यााचा व्यवहार बंद करा, ही त्यांची जुनीच मागणी होती. त्यामुळे मोदी यांना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. कपिल काक यांच्यासारखे ज्येष्ठ लष्करी अधिकारी आता मोदी यांचे जाहीर वाभाडे काढत आहेत, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.