Breaking News

शेअर बाजारात घसरण सुरूच

मुंबई : मुंबई शेअर बाजाराची सुरुवात सोमवारी निराशजनक झाली. आठवड्याच्या सुरुवातीलाच निर्देशांक घसरल्याने शेअर बाजार गडगडला. सोमवारी सकाळी 108.55 गुणांवर असणार्‍या सेन्सेक्समध्ये 0.31 टक्क्यांनी घसरण पहायला मिळाली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीमध्येही 10,684.80 गुणांवर आल्यानंतर अचानक 0.28 टक्क्यांची घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान 35, 545.22 गुणांच्या सेन्सेक्सने शेअर बाजाराची सुरुवात झाली. मात्र कालच्या दिवसाच्या तुलनेत त्यात 108.55 गुणांची घसरण झाली होती. कालच्या दिवसाअखेर 35, 423.48 गुणांवर सेन्सेक्स होता. सेन्सेक्सने आतापर्यंत 35.578.24 गुणांची उंची गाठली होती. तसेच त्यात घसरण होवून अखेर सेन्सेक्स 35, 288.97 गुणांपर्यंत घसरला होता. दुपारी 11.15 वाजेपर्यंत सेन्सेक्स 35, 195.37 गुणांवर पोहोचला आहे. 228.11 टक्क्यांनी घसरण अजूनही कायम आहे.