Breaking News

औद्योगिक प्रकल्पांचा अभ्यास दौऱ्यानिमित्त विद्यार्त्यांची सह. साखरकारखाना व दूध संघाला भेट


संगमनेर/प्रतिनिधी।२९ :- येथील संगमनेर महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार आयोजित करण्यात आला होता. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, राजहंस ऍक्वा, डेअरी व सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना येथे हा दौरा आयोजित करण्यात आला होता. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेणे व औद्योगिक क्षेत्रात उपयोगात येणा-या गणिताचा अभ्यास करणे हा या दौ-याचा मुख्य उद्देश घेऊन नियोजन करण्यात आले होते.
या विद्यार्थ्यांनी प्रथमत: अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विज्ञान व तंत्रज्ञाना मुख्य ग्रंथालयास भेट दिली. यावेळी ग्रंथपाल प्रा. प्रशांत बो-हाडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रंथालयातील सर्व नवीन पुस्तकांची पाहणी विद्यार्थ्यांनी केली. ग्रंथालयातील विविध प्रणालींची उदा. ओपॅक प्रणाली, माहिती ग्रंथपालांकडून करुन घेतली. सिव्हील विभागातील भेटी दरम्यान प्रा. औटी यांनी फ्लुड मेकॅनिक (द्रव व वायु पदार्थ) प्रयोगशाळा दाखवली. त्यातील प्रत्येक उपकरणाची माहीती विद्यार्थ्यांनी घेतली. अत्यंत आधुनिक अशी ही प्रयोगशाळा ज्यात प्रेशर, तापमान, द्रवपदार्थाची गती, वायुपदार्थाची गती आदींचा अतिशय सखोल अभ्यास करता येऊ शकतो, हे पाहुन विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अमृतवाहीनी अभियात्रिकी महाविद्यालयाच्या भेटीसाठी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विनायक शिंदे व प्राचार्य व्यंकटेशन यांनी सहकार्य केले. अभ्यासदौरा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डी. आर. पाटील, विभागप्रमुख प्रा. गुडदे, महाविद्यालयाचे सहल समन्वयक प्रा. आर. डी. गायकवाड व शिक्षकेतर सहकारी संजय काशिद यांनी परिश्रम घेतले.