Breaking News

एंड्रेस अँड हाऊजर्सच्या विस्तारित प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न 100 कोटी रुपयांची गुंतवणूक

औरंगाबाद/प्रतिनिधी  - फ्लो मीटर उत्पादनाच्या क्षेत्रात जगात अग्रेसर असलेल्या एंड्रेस अँड हाऊजर (इंडिया) प्रा. लि. यांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरविले असून, त्याअंतर्गत 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करून विस्तारित प्रकल्पाची उभारणी करण्याचे निश्‍चित केले आहे. या विस्तारित प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी (दि. 2) रोजी अ ँड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक एजीचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) डॉ. बर्नड जोसेफ शेफर यांच्या हस्ते आणि एंड्रेस अँड हाऊजर (इंडिया) प्रा. लि.चे अध्यक्ष आणि संचालक कुलाथू कुमार तसेच प्रकल्प प्रमुख जयेंद्र भिरुड आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
एंड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा. लि.ने आपल्या मेड इन इंडिया आणि स्वीस क्वालिटी इन इंडिया या धोरणांतर्गत या विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. स्वीत्झर्लंडमधील एंड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक एजी या कंपनीची ही उपकंपनी आहे. एंड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा. लि. हा देशातील एक अग्रणी आणि अत्याधुनिक प्रकल्प असून, यामध्ये फ्लो मीटरची तपासणी, चाचणी आणि मोजमाप करण्याची जागतिक दर्जाची उपकरणे बनविली जातात. या उत्पादन प्रकल्पातून आ शिया आणि आफ्रिकेतील फ्लोटेक मीटरच्या बाजारपेठेची फ्लोमीटर आणि सुट्या भागांची गरज पूर्ण केली जाते. औरंगाबादच्या प्रकल्पामध्ये तयार होणारी उत्पादने ही कंपनीच्या एकूण उत्पन्नाच्या 70 टक्के उत्पन्न निर्यातीच्या माध्यमातून मिळवून देते. देशांतर्गत आणि विदेशातून सातत्याने होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन एंड्रेस अँड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा. लि. ने आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे नियोजन केलेले आहे.
विस्तारित प्रकल्प हा मग्रीन कन्सेप्ट आणि एनर्जी एफिशियंटफ असेल. या विस्तारीकरणाअंतर्गत निर्माण होणार्‍या इमारतींवर रूफ टॉप सोलार पॉवर युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा असतील. याचे बांधकाम बारा हजार स्क्वेअर मीटरमध्ये केले जाईल. औरंगाबाद शहराच्या वेगाने होत असलेल्या औद्योगीकरणाच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरेल, या विस्तारीकरणामुळे स्थानिक युवक तसेच लघुउद्योजकांना मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत.