Breaking News

यूजीसीकडून 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर


नवी दिल्ली : देशभरात बारावी बोर्डाचे निकार येण्याच्या तयारीत आहेत.मात्र विद्यार्थ्यांनी निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना सतर्क रहावे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 24 बनावट विद्यापीठांची नावे आहेत. म्हत्त्वाचे म्हणजे या यादीत तब्बल 8 विद्यापीठे ही दिल्लीतील आहेतबारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात. मात्र प्रवेश घेताना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली.सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 24 विद्यापीठ यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करुन सुरु आहे. या विद्यापीठांना बोगस घोषीत केले आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही, असे पत्रक यूजीसीने जारी केले आहे.