Breaking News

पोलीस पाटील भरत डोंगरे यांचा सन्मान

पालघर, दि. 21, फेब्रुवारी - विक्रमगड तालुक्यातील टेभोली या छोट्याशा गावात राहून पोलिस पाटील भरत डोंगरे यांनी आपल्या हुशारी व कष्टाने गेल्या काही वर्षांपासून पो लिसांना अनेक गुन्ह्याचा तपास लावण्यात नेहमीच चांगल्या प्रकारे मदत केली. त्याची दखल घेवून त्यांना पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. 


भरत डोंगरे 7 ते 8 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 22 नोव्हेंबर 2015 रोजी घडलेल्या एका गुन्ह्याचा तपास करताना मोलाची भूमिका बजावली होती. संबंधित गुन्ह्याचे घटनास्थळ हे अंधेरी गावाकडे जाणार्‍या रस्त्यालगत 40 फुट जंगलात होते. या गुन्ह्यातील आरोपी व मृत व्यक्ती अज्ञात होते. त्यामुळे हे प्रकरण सुमारे 9 महिने तपास कामी सुरु होते. या दोघांची आहिती काढण्याचे महत्त्वाचे काम पोलिस पाटील भरत डोंगरे यांनी केले होते.