रमेश पोवार महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी
मुंबई प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघासाठी नवीन प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू रमेश पोवार यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. जोपर्यंत तुषार अरोठेंच्या जागी योग्य व्यक्तीची निवड होत नाही तोपर्यंत रमेश पोवारकडे जबाबदारी असणार आहे.
तुषार अरोठे यांच्या कोचिंग पद्धतीवर खेळाडू नाराज होते. भारतीय महिला संघाच्या टीम कॅम्पला २५ जुलैपासून बंगळुरुत सुरुवात होत आहे. रमेश पोवार या कॅम्पमध्ये सहभागी होईल. दरम्यान बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून अर्ज करण्यासाठी २० जुलै अंतिम तारीख आहे.४० वर्षीय रमेश पोवार दोन कसोटी व ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. दोन कसोटी सामन्यात त्याने सहा विकेट्स घेतलेल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४८ सामन्यात ४७० विकेट्स घेतल्या आहेत.