Breaking News

‘प्रवरा’चे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर उत्साहात


प्रवरानगर प्रतिनिधी - प्रवरा ग्रामीण शिक्षण शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर नुकतेच संपन्न झाले, अशी माहिती प्राचार्या डॉ. विद्या वाजे यांनी दिली. प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी समाजसेवक संतोष पवार हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, की समाजसेवा ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी नसते. तर ती मनापासून करावी लागते. याप्रसंगी पवार यांच्या संस्थेची माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. विद्या वाजे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. भोसले सचिन, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर गोरे, उपाध्यक्ष बनसोडे, डॉ. गजानन मांढरे आदीसंह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.