मालदाडरोड परिसरात जुगार अड्ड्यावर छापा
संगमनेर / प्रतिनिधी
शहरातील मालदडरोड परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १३ हजार १७० रुपये रोख व जुगारीचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी १४ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
शहरातील मालदाड रोड भागात राहत असलेला अमोल म्हस्के याच्या घरात तिरट नावाचा जुगार खेळत सुरु आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना समजली. त्यांनी तात्काळ पोलीस पथकास पाठवून छापा टकण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता अमोल म्हस्के [रा. मालदाड रोड], विजय सुरेश गुंजाळ, साहेबराव राजू पवार, मनोज अण्णा पवार [रा. वडारवाडी], धिरज विनोद कळसकर, गोविंद लकप्पा दासरी [रा. विडी कामगार सोसायटी], शुभम हिरामण शिंदे, लखन मारुती शिंदे, साईनाथ अंनमलग शिंदे, प्रविण राजेंद्र गायकवाड [रा. शिवाजीनगर], निलेश हरिभाऊ टोपे [रा. मालदाड रोड], नयन राजेंद्र मुर्तडकरा [रा. राहणेमळा] शरद विठ्ठल शिंदे, कृष्णा राजेंद्र भडांगे [रा. दत्ता देशमुखनगर] या १३ जणांना तिरट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. याबाबत पो. कॉ. अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांच्या विरोधात मुंबई जुगार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना न्याया
लयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.