पर्यावरणाच्या विचारातून ‘वृक्ष परिवारा’साठी ५ हजार!
संगमनेर प्रतिनिधी
येथील महेश नागरी सहकारी पतसंस्था, महेश अर्बन सेवा प्रतिष्ठान, गंगामाई मंदिर ट्रस्ट आणि वृक्षपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज [दि. ११] गंगामाई परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महेश अर्बन सेवा प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष राजकुमार लाहोटी यांनी वृक्ष परिवारासाठी ५ हजार १०० रुपयांचा धनादेश अध्यक्ष डॉ. राजेंद्र मालपाणी यांच्याकडे सुपूर्त केला.
वृक्ष परिवार हा वृक्षारोपण, त्यांचे संगोपन व संवर्धन ही कामे करतो. सध्या याचीच समाजाला गरज आहे. हे ओळखून महेश नागरी सहकारी पतसंस्था, महेश अर्बन सेवा प्रतिष्ठान, गंगामाई मंदिर ट्रस्ट च्यावतीने वृक्ष परिवारास सहकार्य करण्यात आले. आर्थिक भार महेश नागरी सहकारी पतसंस्था, महेश अर्बन सेवा प्रतिष्ठान यांनी उचलला. गंगामाई मंदिर ट्रस्टने यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे हा वृक्षारोपण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी वृक्ष परिवारचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र के. मालपाणी यांनी वृक्ष परिवाराच्यावतीने तालुक्यात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महेश पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश जाजू यांनी वृक्ष परिवाराचे आभार मानले. डॉ. शशिकांत पोफळे यांनी महेश पतसंस्था व महेश अर्बन सेवा प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.
महेश पतसंस्थेचे चेअरमन योगेश जाजू, व्हाईस चेअरमन निलेश बाहेती, महेश अर्बन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार लाहोटी, गंगामाई मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष गिरीश सोमाणी, अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे मानदमंत्री अजय जाजू, सुभाष कोथमिरे, ज्ञानेश्वर काजळे, राजाभाऊ सोमाणी यांचा सत्कार केला. यावेळी माहेश्वरी महासभेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत पोफळे, वृक्ष परिवारचे उपाध्यक्ष जगदिश अट्टल, सचिव प्रकाश गोडगे, महेश लाहोटी, जगदिश बद्दर, प्रकाश सराफ, रामभाऊ जाजू, प्रकाश चांडक, किशोर पापडेजा, जितेंद्र पंजाबी, योगेेश जाजू, मदनलाल पारख, दिलीप मुळे, गोपाल भुतडा, महेश पतसंस्थेचे व्यवस्थापक आडकी व त्यांचे सहकारी आदी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र मालपाणी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
