Breaking News

दखल - भाजपकडून आणखी एका मित्राचा विश्‍वासघात

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पूर्वी एक करार झाला होता. त्यानुसार मित्रपक्षांनी परस्परांचे आमदार, खासदार, कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असं ठरलं होत; परंतु विरोधक ांचं अवकाश व्यापल्यानंतर पक्षविस्तार करायला भाजपला मर्यादा आल्यानंतर आता भाजपनं मित्रपक्षांच्याच नेत्या, कार्यकर्त्यांना फोडायला सुरुवात केली आहे. भाजपनं अगोदर अकाली दल, शिवसेना, तेलुगु देसम आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांना कच्छपि लावायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नाराज आमदार, खासदारांना तर भाजपनं गळ लावला आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांच्या आमदारांना फोडून भाजपत प्रवेश देण्याची व्यूहनीती आखली आहे. 

शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. त्यालाही शिवसेनेच्या काही आमदार, खासदारांचा विरोध आहे. त्यातील काहींना निवडून येण्याची खात्री नाही. भाजपचं संघटन आणि मोदी यांचं वलय लक्षात घेऊन अशा काही आमदार, खासदारांना शिवसेनेतून भाजपत आणण्याची भाजपची व्यूहनीती आहे. त्याबाबतच्या बातम्या ही प्रकाशित झाल्या. शिवसेनेला त्याची माहिती आहे. त्यामुळं तर शिवसेनेनंही जशास तसं धोरण ठेवलं आहे. त्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना शिवसेनेत घेण्यात आलं. भाजपनं ही आता देशांत विस्तारासाठी तेलंगणा, पंजाब, आंध्र प्रदेश, तमीळनाडू, महाराष्ट्र. जम्मू-काश्मीर या राज्यांवर लक्ष केैंद्रीत केलं आहे. या राज्यांत मित्रपक्ष प्रबळ आहेत. विरोधकांपेक्ष मित्रपक्षांच्या जागा कमी कशा करता येतील आणि तिथं आपले उमेदवार कसे निवडून आणता येतील, यावर भाजपचा भर आहे. त्यातही आता सर्वाधिक लक्ष पीडीपीवर आहे.
पीडीपी व भाजप हे परस्परविरोधी विचारांचे पक्ष. भाजप कडव्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केल्याचं दाखवितो तरी; परंतु पीडीपीला कायम दहशतवादी संघटनांचा पुळका. असं असलं, तरी दोघंही सत्तेसाठी एकत्र आले. मुफ्ती मोहंमद सईद यांनी जेव्हा भाजपशी युती केली, तेव्हाच पीडीपी फुटीच्या उंबरठयावर होता. त्याचं कारण भाजप हिंदुबहुल जम्मू खोर्‍यातून निवडून आला होता, तर पीडीपीचे जास्त आमदार श्रीनगर परिसरातील होते. भाजपशी युती केली, तर काश्मीर खोर्‍यातील जनाधार गमावण्याची भीती पीडीपीच्या आमदारांना होती. असं असताना मुफ्ती यांनी युतीची अपरिहार्यता आमदारांच्या गळी उतरविली. त्यातून तिथं भाजप व पीडीपीची सत्ता आली. सत्तेनंतरही दोन्ही पक्षांतील वैचारिक दुरावा कायम होता. भाजपची पीडीपीमागं फरफट होत होती. सत्तेची मलई गोड लागत होती, तोपर्यंत भाजप व पीडीपी एकत्र नांदले. दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असताना काश्मीर प्रश्‍न त्याला सोडविता आला नाही. उलट प्रश्‍न चिघळला. लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असे वाटायला लागल्यानंतर पीडीपीशी भाजपनं काडीमोड घेतला. या मुद्याचं भांडवल करून देशातील हिंदू मतांची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. काश्मीरपासून क न्याकुमारीपर्यंत आपल्याच पक्षाची सत्ता आहे, हे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही ठिकाणी नवे मित्र जोडणं असो, की जुन्या मित्रांची फोडाफोड ; भाजपचे प्रयत्न चालू आहेत. काश्मीरमध्ये आणखी हातपाय पसरण्याला भाजपला मर्यादा आहेत. त्यामुळं भाजपनं आता पीडीपीत फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपचे नेते ते नाकारत असले, तरी त्यावर कोणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही. घटना तर पीडीपीतील फुटीकडं अंगुलीनिर्देश करणार्‍या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीतील बंडखोर आमदारांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकीला दांडी मारली असून ही मुफ्ती यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. बंडखोर आमदारांची नाराजी दूर होईल आणि ते पुन्हा पक्षात सक्रीय होतील, असा दावा पीडीपीच्या वतीनं करण्यात आला आहे. भाजपनं या घडामोडींशी आपला संबंध नाही, असा दावा केला आहे. जम्मू- काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीचं युती सरकार पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. पीडीपीचे बंडखोर आमदार आणि सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स या पक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगितलं जातं. तेथील विधानसभेत एकूण 87 आमदार असून त्यापैकी पीडीपीचे 28, भाजपचे 25, नॅशनल कॉन्फरन्सचे 15, काँग्रेसचे 12, पीपल्स का ॅन्फरन्सचे 2 आणि अपक्ष व अन्य पक्षांचे 9 आमदार आहेत. भाजपला पीपल्स कॉन्फरन्स आणि एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा असून सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी 16 आमदारांची गरज आहे. सोमवारी मेहबूबा मुफ्ती यांच्या घरी पक्षातील नेत्यांची बैठक होणार होती. या बैठकीला बंडखोर आमदारांनी दांडी मारली. अब्दुल माजिद, जावेद अहमद बेग आणि अब्बास वानी हे तीन आमदार मुफ्ती यांची भेट घेणार होते; मात्र तिघेही मुफ्तींच्या निवासस्थानाकडं फिरकले नाहीत, तर दुसरीकडं बंडखोर आमदारांशी चर्चा करण्यासाठी मुफ्ती यांच्या निकटवर्तीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. मुफ्ती यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील काही नेते व आमदार राफियाबादमध्ये पक्षातील नेते अल्ताफ बुखारी यांच्या निवासस्थानी गेले होते. बुखारी यांच्या मातोश्रीचं निधन झालं असून सांत्वनासाठी नेते तिथं गेल्याचं सांगितलं जाते. बंडखोर आमदार अब्दुल माजिद यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. मी बुखारींच्या निवासस्थानी गेलो होतो; पण मुफ्ती यांची भेट घेण्याचा माझा तुर्तास विचार नाही, असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडं पक्षातील काही बंडखोर आमदार जावेद बेग यांच्या निवासस्थानी गेले होते. या बैठकीत जम्मू- काश्मीरमधील सद्य राजकीय प रिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं. जावेद बेग यांचे पक्षनेतृत्वाशी काही मतभेद होते; पण त्यावर तोडगा निघू शकेल. अन्य बंडखोर आमदारही लवकरच पक्षात परततील अशी आशा आहे, असं पीडीपीतील एका नेत्यानं सांगितलं. अन्सारी यांच्याबाबत मात्र पीडीपीतील नेत्यांनी शंका व्यक्त केली.
भाजपचे जम्मू- काश्मीरमधील प्रभारी राम माधव यांनी बंडखोर आमदारांशी चर्चा सुरू असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. जम्मू- काश्मीरमध्ये आमच्यावतीनं सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू नाहीत. पीडीपीतील काही आमदारांनी बंड केलं आहे; पण त्यांच्याशी भाजपची चर्चा सुक्षीं नाही, असं माधव यांनी सांगितलं. मुख्यमिंंत्रपद आणि उपमुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चा या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे