Breaking News

मनोरा आमदार निवास घोटाळाः कारवाईच्या टप्प्यावर चौकशी अहवालात उणिवा शोधण्याचा हेतू कुटच!

मुंबई/ विशेष प्रतिनिधी
चौकशी अहवाल सादर होऊन कारवाई सुरू झाल्यानंतर मनोरा आमदार निवास इमारतीच्या अपहार प्रकरणाच्या चौकशीत उणिवा शोधणार्‍या प्रशासनाचा हेतूत खोट असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील एका गोटातून व्यक्त केल्या जात आहेत. कर्तव्यदक्ष प्रधान सचिवांना हटवून आनंद कु लकर्णींच्या शिष्याला सचिव पदावर आणणे हा देखील हेतू पुरस्सर कटाचा भाग मानला जात आहे

मनोरा आमदार निवास इमारतीतील कक्षात कुठलेही काम न करता खर्ची दाखवलेला 3 कोटी सत्तर लाखाचा निधी सरकार आणि साबांतील भ्रष्ट प्रशासनासाठी अवघड जागेवरचे दुखणे झाले आहे. या दुखण्याच्या वेदना कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मलम शोधली जात आहे.
यापुर्वी हे प्रकरण चौकशी पुर्ण करून माजी साबां प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांनी कारवाईच्या टप्प्यावर आणले होते. दोन सहअभियंते आणि कालांतराने कार्यक ारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचे निलंबन झाले होते, या कारवाईमुळे चौकशी अहवाल योग्य आहे, यावर शिक्कामोर्तब होऊन गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल होऊ न बडतर्फीची कारवाई टाळणे अवघड बनले होते.ही कायदेशीर कारवाई साबांसह शासन प्रशासनातील भ्रष्ट पिलावळीला परवडणारी नाही, हे लक्षात आल्यानंतर या ला ॅबीने कुटील डाव टाकण्यास सुरूवात केली. आशिषकुमार सिंह यांना हटवून या पिलावळीला पुरक ठरणारे सचिव नियूक्त करण्याच्या खेळीत मनोज सौनिक यांची वर्णी लावण्यात आली. मनोज सौनिक आणि पुर्वाश्रमीचे प्रभारी अप्पर प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्यातील मधूर संबंध सर्वपरिचीत आहेत. प्रशासकीय सेवेत सौनिक हे कुलकर्णी यांचे अनुयायी म्हणून ओळखले जातात. शहर इलाखा विभागातील मनोरा आमदार निवास इमारत आणि मंत्रालय डेब्रीज घोटाळ्यात संशयीत असलेले दोन्ही कार्यकारी अभियंता आणि आनंद कुलकर्णी यांचे संबंधही सर्वश्रूत आहेत आणि म्हणूनच या संशयीतांना अभय देण्याच्या हेतूने सौनिक यांना या पदावर आणण्यात आले.
मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नियोजीत डावाप्रमाणे एकएक चाल खेळण्यास सुरूवात झाली.दि. 14/6/2018 रोजी अवर सचिव गो. भ. शिंदे यांच्या स्वाक्षरीने अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार आणि अरविंद सुर्यवंशी यांना पाठविले पत्र ही या डावाची पहिली चाल मानली जात आहे. (क्रमशः)