पानोडी संरपचपदी नंदा जाधव
आश्वी : संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्टया प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या पानोडी ग्रामपंचायतीच्या संरपच पदी नंदा राजेंद्र जाधव यांची निवड झाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करत 6 मते घेवून त्या विजयी झाल्या आहेत. तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत नामदार विखे पाटील पुरस्कृत जनसेवा विकास मंडळाने 11 पैकी 6 जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती. संरपच पद हे सर्व साधारण महिला राखीव असल्याने महिलांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने अडीच-अडीच वर्षाचा कालावधी ठरविण्यात येवून शांताबाई सोपान घुगे यांना संधी देण्यात आली. घुगे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, यानंतर संरपच पद निवडीचा प्रक्रिया सुरु झाल्याने संरपच पदाच्या निवडीकरिता जनसेवा विकास मंडळाकडून नंदा राजेंद्र जाधव तर शेतकरी विकास मंडळाकडून सुगंधा जयराम मधे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र सदस्याच्या मागणीवरून गुप्तपध्दतीने मतदान घेण्यात आल्याने 11 मतदानापैकी 6 मते घेवून, नंदा राजेंद्र जाधव विजयी झाल्या. तर सुगंधा जयराम मधे यांना अवघी 5 मते पडली.