Breaking News

‘तो’ डंपर चौघांनी नेला पळवून

कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

बेकायदा वाळू वाहतूक करणारा तहसीलदारांनी जप्त केलेला डंपर चौघांनी पळवून नेला. हा डंपर कोपरगाव बस आगारात लावलेला होता. तो स्विप्ट कारमधून आलेल्‍या चार जणांच्‍या टोळक्‍याने वॉचमनला फसवून तो पळवून नेला. 

यासंदर्भात बस आगाराच्‍या वॉचमन वॉचमन नारायण बाबुराव गायकवाड यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी त्या चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. विना परवाना बेकायदा वाहतूक

दरम्यान, पोलिसांनी तपास करून रात्री उशिरा गाडी मालक अमोल रामहरी वाजे {रा. डुबेरे ता. सिन्नर}, रामदास लहू कुंदनके {रा. कोळपेवाडी शिवार}, दत्त्ता बाजीराव इंगळे, {रा. निमगाव ता. निफाड} , स्वप्नील उत्तम दिघे {रा. देवपूर, ता. सिन्नर }यांना अटक केली. त्यांना आज {दि. २} कोर्टात हजर केले असता त्यांची जामिनवर सुटका करण्यात आली.